Ad will apear here
Next
मसाल्यांच्या पदार्थांपासून साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन
अरविंद जोशी यांची अनोखी चित्रे
पुणे : लवंग, मिरी, दालचिनी हे मसाल्याचे पदार्थ खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी वापरले जातात; पण अरविंद जोशी यांनी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करून चित्रे साकारली आहेत. या अनोख्या चित्रांचे ‘इंटरफ्यूजन’ हे प्रदर्शन सध्या दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सुरू आहे.

मसाल्याचे विविध पदार्थ, पाने, फुले, काड्या यांचा वापर करून अरविंद जोशी यांनी विविध चित्रे साकारली आहेत. हे पदार्थ वापरून खुलवलेले रंग वेगळाच परिणाम करतात.

 प्रदर्शनातील सत्तरपैकी पन्नास कलाकृती या नैसर्गिक घटकांपासून घडवलेल्या आहेत. खराटा, केरसुणी, काडीपेटीतील काड्या, गुलमोहर व कडुनिंबाच्या झाडांच्या बारीक काड्या, काथ्या, दोरखंड, शंख, शिंपले, लाकडी मणी आदींचा वापर करून या कलाकृती साकारल्या आहेत. 

नोकरीनिमित्त मुंबईत राहिलेले; पण मूळचे रत्नागिरीचे असलेले ७६ वर्षीय अरविंद जोशी कमर्शियल आर्टिस्ट आहेत. त्यांचे निसर्गावर अतिशय प्रेम आहे. त्यामुळे नैसर्गिक रंग, घटक त्यांना भुरळ घालतात. तीस वर्षांपूवी परदेशी पाहुण्यांच्या मागणीवरून त्यांनी भारतीय वारसा दर्शवणारी कलाकृती करून दिली होती. ती नैसर्गिक घटकांपासून तयार केली होती. तिचे खूप कौतुक झाले. 

त्यानंतर त्यांना नैसर्गिक घटक, मसाल्याचे पदार्थ यांचा वापर करून कलाकृती साकारण्याचा छंदच जडला. निवृत्तीनंतर त्यांनी अशा कलाकृतीवर घडविण्यावर जास्त भर दिला. तमालपत्र, दालचिनी यांसारखे मसाल्याचे पदार्थ वापरून त्यांनी विविध चित्रे तयार केली आहेत. त्यांचा पोत आणि रंग अत्यंत लक्षवेधक आहेत. त्यांनी केलेली ऑइल पेंटिंग्जही आहेत. नजर खिळवून ठेवतात. 

मंगळवार, २६ मार्चपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७.३० या वेळेत हे प्रदर्शन विनामूल्य खुले आहे.

कार्यक्रमाविषयी :
इंटरफ्यूजन चित्रप्रदर्शन 
स्थळ : दर्पण आर्ट गॅलरी, सेनापती बापट मार्ग.
दिवस व वेळ : मंगळवार, २६ मार्चपर्यंत, सकाळी १० ते ७.३० वाजेपर्यंत. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZMNBY
Similar Posts
‘ब्रश स्ट्रोक्स’ या समूह चित्रप्रदर्शनाचे आयोजन पुणे : एकाच चित्रप्रदर्शनात तब्बल १५ चित्रकारांची कला अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. निमित्त आहे चित्रकार निलेश पवार यांच्या कलाश्री आर्ट्स या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘ब्रश स्ट्रोक्स’ या चित्रप्रदर्शनाचे. येत्या गुरुवारी, ११ एप्रिल ते रविवार, १४ एप्रिल २०१९ दरम्यान सेनापती बापट रस्त्यावरील
पाच वर्षांच्या अवनीची चित्रकला करतेय थक्क! पुणे : निळ्याशार समुद्रातील रंगीबेरंगी मासे... अवतीभोवती सुंदर झाडे असलेले ट्री हाऊस... रंगीबेरंगी पक्षी... फुलपाखराच्या आकारातील कोलाज... हातांच्या ठशांनी साकारलेले सुंदर चित्र... अशा विविध प्रकारच्या चित्रांच्या माध्यमातून अवघ्या पाच वर्षांच्या अवनीने आपले अनुभवविश्व कॅनव्हासवर साकारले आहे. या चिमुरडीची
हस्तकलेतील नवदुर्गांद्वारे ‘नवरंग’ प्रदर्शनाचे आयोजन पुणे : वेगवेगळ्या हस्तकलांमध्ये पारंगत असणाऱ्या नऊ महिला कलाकारांनी ‘नवरंग’ या हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. पत्रकारनगर येथील दर्पण आर्ट गॅलरी येथे बुधवार, नऊ ते रविवार, १३ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळेत सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
‘दी गिफ्ट ट्री’च्या उपक्रमाला १४ पासून सुरुवात रत्नागिरी : शहरातील ‘दी गिफ्ट ट्री’ संस्था आणि पुणे येथील हरित मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ येत्या १४ जानेवारीला मारुती मंदिर येथे केला जाणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language